शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

एकतर्फी प्रेमातून तरुणाची हत्या : मान व पाठीवर केले चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 9:27 PM

तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाच तिचा आधीचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर तरुणासोबत भांडायला सुरुवात केली. भांडण येथेच थांबले नाही तर, त्याने तरुणाच्या मान व पाठीवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमधील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील ब्राह्मणी (कळमेश्वर) येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : तरुण त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाच तिचा आधीचा मित्र तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यासमोर तरुणासोबत भांडायला सुरुवात केली. भांडण येथेच थांबले नाही तर, त्याने तरुणाच्या मान व पाठीवर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळमेश्वर शहरातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या नवजीवन कॉलनीमधील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.तुषार विजय झोडे (१९, रा. सोनखांब, ता. काटोल) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील विजय झोडे हे कोहळी (ता. कळमेश्वर) शिवारातील भागीरथ टेक्सटाईल्स मिलमध्ये नोरीकला असल्याने ते कुटुंबीयांसह पठाण लेआऊट, ब्राह्मणी येथील सुरेश माडेकर यांच्या घरी किरायाने राहतात. विधीसंघर्षग्रस्त बालक हा १६ वर्षांचा असून, आनंदनगर, आंबागेट, अमरावती येथील रहिवासी असून, तो मागील काही वर्षांपासून आईसोबत नवजीवन कॉलनी ब्राह्मणी येथील कृष्णा रोडे यांचे घरी किरायाने राहतो. त्याचे वडील मात्र अमरावतीलाच राहतात.विधीसंघर्षग्रस्त बालकाचे येरला येथील मुलीसोबत मैत्री व प्रेमसंबंध होते. मध्यंतरी त्यांचा ‘ब्रेकअप’ झाला आणि तिची तुषारसोबत ओळख होऊन मैत्री झाली. तुषारने तिला नवजीवन कॉलनीतील सिद्धीविनायक गणेश मंदिराजवळ फोन करून भेटायला बोलावले होते. ते दोघेही दुपारी १ वाजताच्या सुमारास मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडाखाली बोलत असल्याची माहिती विधीसंघर्षग्रस्त बालकाला मिळाली. तो मंदिर परिसरात पोहोचताच त्याला दोघेही आपसात बोलत असल्याचे दिसले.चिडलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने तिच्यासमोर तुषारसोबत भांडायला सुरुवात केली. काही वेळातच त्याने चाकू काढून तुषारच्या मान आणि पाठीवर वार केले. तो खाली कोसळताच त्याने तिथून पळ काढला. दुसरीकडे तिने लगेच पोलीस व रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले आणि त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उपभिागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले.तुषार आयटीआयचा विद्यार्थीतुषार हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून, त्याला लहान बहीण आहे. तो गोधनी येथील आयटीआयमध्ये शिकायचा. विधीसंघर्षग्रस्त बालकही एकुलता एक असून, त्याने इयत्ता नववीपासून शिक्षण सोडले. मध्यंतरी तो वडिलांकडे अमरावतीला होता. तो १५ दिवसांपूर्वीच आईकडे ब्राह्मणीला आला होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, अमरावती शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. तुषारवर हल्ला केल्यानंतर तो मित्राच्या मोटरसायकलने पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खापरखेडा (ता. सावनेर) परिसरातून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून