हल्ल्याचा सूड घेण्यासाठी खून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:14+5:302021-06-24T04:07:14+5:30
नागपूर : महिनाभरापूर्वी झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी गुन्हेगाराचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटकाच्या भीमसेना झोपडपट्टीत घडली. ...

हल्ल्याचा सूड घेण्यासाठी खून ()
नागपूर : महिनाभरापूर्वी झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी गुन्हेगाराचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटकाच्या भीमसेना झोपडपट्टीत घडली. शेषराव किसन बनसोड (३५) असे मृतकाचे तर अभय ज्ञानेश्वर लांडगे (३४) असे आरोपीचे नाव आहे.
शेषराव पूर्वी गुन्हेगारी जगताशी निगडित होता. त्याच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. महिनाभरापूर्वी त्याचा आरोपी अभयशी वाद झाला. या वादात शेषरावने अभयला जखमी केले होते. जरीपटका पोलिसांनी शेषरावविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याला त्वरित जमानत मिळाली. त्यानंतर तो अभयला धडा शिकविण्याचा विचार करीत होता. तो संधी शोधत होता. शेषरावला दारूचे व्यसन आहे. त्याचा परिवार त्याचा भाऊ मनोज बनसोडसोबत राहत होता. शेषराव एकटाच भीमनगर झोपडपट्टीत राहत होता. मंगळवारी रात्री ७.३० वाजता अभयने राफ्टरने वार करून शेषरावला जखमी केले. नागरिकांनी अभयला संशयास्पद स्थितीत शेषरावच्या झोपडीतून जाताना पाहिले. काही वेळानंतर नागरिक शेषरावच्या झोपडीत गेले असता तो जखमी अवस्थेत आढळला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अभयला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
.............