शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या; सिमेंटच्या गट्टूने ठेचले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 16:35 IST

पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.

नागपूर : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने एका युवकाचा खून केला. ही घटना सोमवारी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबाबुद्धनगर येथे घडली. दिवसाढवळ्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दीक्षित भगवान जनबंधू (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे, तर आसिफ अहमद खान (३२) असे मृताचे नाव आहे. दीक्षित आणि आसिफ एकाच वस्तीत राहतात. दीक्षित मॅक्सी चालवितो, तर आसिफ शाळेत चौकीदार होता. दीक्षितला आपल्या पत्नीशी आसिफचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळे दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वैमनस्य सुरू होते. वर्षभरापासून त्यांच्यातील वाद वाढला होता. दीक्षितने हल्ला करून आसिफला जखमी केले होते. आसिफच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी दीक्षित विरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. पाचपावली पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यामुळे दीक्षित संतप्त होता असे सांगण्यात येत आहे.

दीक्षितमुळे घाबरलेल्या आसिफने आपसात मतभेद दूर करण्याची तयारी दर्शवली होती; परंतु दीक्षित बदला घेण्यासाठी आतुर होता. सोमवारी सकाळी १० वाजता आसिफ दीक्षितच्या घराजवळ येऊन शिवीगाळ करू लागला. ते ऐकूृन दीक्षित तेथे आला. दोघांमध्ये वाद झाला. दीक्षितने आसिफला मारहाण केली. त्याने दगडाने डोके ठेचून आसिफचा खून केला. घटनेच्या वेळी वस्तीत वर्दळ होती. खुनाची घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पाचपावली पोलिसांनी आसिफचा मृतदेह मेडिकलमध्ये पोहोचविला. पोलिसांनी शोध घेऊन दीक्षितला अटक केली. दीक्षितने पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची शंका असल्यामुळे खून केल्याचे सांगितले. पोलीस दीक्षितची पत्नी आणि इतर साथीदारांच्या भूमिकेची चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी घेतले नाही गांभीर्याने

दीक्षित विरुद्ध चोरी, हल्ला तसेच धमकी देण्यासह तीन गुन्हे दाखल आहेत. दीक्षितने आसिफवर यापूर्वी केलेला हल्ला पोलिसांनी गांभीर्याने घेतला असता तर ही घटना टळली असती. पाचपावली ठाण्याचा परिसर खुनाच्या घटनांमुळे नेहमीच बदनाम राहिला आहे. त्याचे परिणाम जुने ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भोगावे लागले आहेत. तरीसुद्धा पोलिसांनी गांभीर्य न ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर