तरुणाची आत्महत्या नसून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:23+5:302021-01-08T04:22:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली नसून, त्याचा खून करण्यात आल्याचा आराेप त्याच्या आईने न्यायालयात ...

तरुणाची आत्महत्या नसून खून
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली नसून, त्याचा खून करण्यात आल्याचा आराेप त्याच्या आईने न्यायालयात सादर केलेल्या अर्जात केला. त्याअनुषंगाने न्यायालयाने आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविण्याचा आदेश पाेलिसांना दिला. या प्रकरणात पाेलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
अक्षय गंगाधर डाेनारकर (२२, रा. नवेगाव खैरी, ता. पारशिवनी) असे मृताचे तर सागर कृष्णा बगमारे, निखिल यादवराव बगमारे, प्रवीण यादव बगमारे, सुमित कृष्णा बगमारे, मनाेज अशाेक पल्लेवार, विक्की हेमराज राऊत, अक्षय विजय बगमारे व कपिल नारायण दरवाही सर्व रा. नवेगाव खैरी, ता. पारशिवनी अशी आराेपींची नावे आहेत.
नवेगाव खैरी येथील आदर्श विद्यालय परिसरात अक्षय डाेनारकरचा १३ मार्च २०२० राेजी सकाळी ६.१५ वाजताच्या मृतदेह आढळून आला हाेता. त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. परंतु, अक्षयच्या आईने पारशिवनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात अर्ज सादर करून अक्षयने आत्महत्या केली नसून, त्याचा संगनमत करून खून करण्यात आल्याचा आराेप केला. त्यामुळे या प्रकरणाची नव्याचे चाैकशी करण्यात आली. परिणामी, पारशिवनी पाेलिसांनी या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशान्वये आठ जणांविरुद्ध भादंवि ३०२, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे करीत असून, वृत्त लिहिस्ताे कुणालाही अटक केली नव्हती.