लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुल्लक वादात एका अल्पवयीन मित्राने आपल्याच मित्राचा गळा कापून खून केला. ही धक्कादायक घटना दाभा परिसरातील साईनगर येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. आफताफ खान रफीक खान (१६) असे मृताचे नाव आहे. ऑटो चालक रफीक खान साईनगरात राहतात. आफताब त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. आफताबची परिसरातच राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीनसोबत मैत्री होती. मंगळवारी रात्री ९.३० वाजता जेवन झाल्यावर आफताब आरोपी मित्राला भेटायला जात असल्याचे सांगून घरून बाहेर पडला. वस्तीत त्याची आरोपीसोबत भेट झाली. तिथे कुठल्यातरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीनुसार आफताब त्याला शिविगाळ करू लागला. त्याला रोखल्यावरही तो शिविगाळ करीत होता. तसेच दगड फेकून मारला. प्रत्युत्तरात त्यानेही आफताबला दगड फेकून मारला. यात आफताबचे डोके फुटले. ते पाहून आरोपी आफताबला पाण्याच्या टाकीजवळील निर्जन मैदानात घेऊन गेला. तिथे रक्तस्त्राव रोखण्यासाठी घरून चहापत्तीही घेऊन आला. ती चहापत्ती आफताबच्या जखमेवर लावली. आरोपीनुसारजखमी झाल्याने आफताब अतिशय संतापला होता. त्याने त्याला ‘तू उद्या सकाळचा सूर्य पाहू शकणार नाही.’ असे म्हणत धमकावले. यामुळे आफताब बदला घेईल. तो आपल्याला सोडणार नाही, अशी भिती त्याला वाटली. त्याने कटरने आफताफचा गळा कापला. त्याचा खून करून तो फरार झाला. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अल्पवयीन आरोपीस अटक केली. एकुलत्या एक मुलाच्या हत्येमुळे कुटुंबीय मानसिक धक्क्यात आहेत. आरोपीजवळ अगोदरपासूनच कटर होता. त्यामुळे त्याच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण होत आहे.
अल्पवयीन मित्राचा खून : नागपूर दाभा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:52 IST
शुल्लक वादात एका अल्पवयीन मित्राने आपल्याच मित्राचा गळा कापून खून केला. ही धक्कादायक घटना दाभा परिसरातील साईनगर येथे मंगळवारी घडली.
अल्पवयीन मित्राचा खून : नागपूर दाभा येथील घटना
ठळक मुद्दे अल्पवयीन आरोपी ताब्यात