शेतातील चाैकीदाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:01+5:302021-02-05T04:42:01+5:30
सावनेर : संत्र्याच्या बागेत चाैकीदारी करणाऱ्याचा जाड शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ...

शेतातील चाैकीदाराचा खून
सावनेर : संत्र्याच्या बागेत चाैकीदारी करणाऱ्याचा जाड शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा-काेथुळणा मार्गावरील ढकारा शिवारात घडली.
राजाराम पुनाराम काेडवते (६५, रा. सालई, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव असून, त्याचा खून कलीराम सनही उईके (५०, रा. पाेतलई, ता. कुरई, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) याने केला, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला असून, पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत. दाेघेही ढकारा (ता. सावनेर) शिवारातील संत्र्याच्या बागेत चाैकीदार म्हणून काम करायचे. शिवाय, त्यांना दारूचेही व्यसन हाेते.
दाेघेही मनसाेक्त दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. त्यातच दुसऱ्या दिवशी राजारामचा शेतात मृतदेह आढळून आला. कलीराम मात्र त्याच दिवसापासून बेपत्ता झाला. पाेलिसांनी राजारामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, त्याचा मृत्यू डाेके, पाेट व छातीवर जाड शस्त्राने वार केल्याने झाल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदविला असून, कलीराम घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याने तसेच त्याची सायकलही तिथे आढळून न आल्याने हा खून कलीरामने केला असावा, अशी शक्यता पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास ठाेणेदार तथा सहायक पाेलीस निरीक्षक अजय मानकर करीत आहेत.