शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीक बांधकाम कामगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 20:21 IST

Murder of a construction worker , crime news घरात शिरून बांधकाम कामगाराच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार करीत त्याचा खून करण्यात आला.

ठळक मुद्देपिपळा (डाकबंगला) येथील घटना : टिकासने केले छाती, डाेक्यावर वार

लाेकमत न्यूज नेटवर्कपिपळा (डाकबंगला) : घरात शिरून बांधकाम कामगाराच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार करीत त्याचा खून करण्यात आला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथे बुधवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. त्याचा खून कुणी व का केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

संतोष गोकुलनाथ सोळंकी (५५, रा. पिपळा-डाकबंगला, ता. सावनेर) असे मृताचे नाव आहे. संताेषचे पिपळा (डाकबंगला) येथील रेल्वेस्थानकाजवळ घर असून, तो बांधकाम कामगार म्हणून काम करीत उपजीविका करायचा. ता. रात्री घरी एकटाच असल्याने अज्ञात आराेपीने त्याच्या घरात प्रवेश करीत त्याच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार केले. तो गतप्राण हाेताच आराेपीने घटनास्थळाहून पळ काढला.दरम्यान, त्याचा शेजारी बळीराम शेंडे गुरुवारी सकाळी त्याला बाेलवायला त्याच्या घरी गेला असता, दारालगत विटांचे तुकडे दिसले. त्याला चाेरीचा संशय आल्याने त्याने दार उघडून आत बघितले असता, त्याला संताेष रक्ताच्या थाराेळ्यात पडला असल्याचे दिसले. त्यामुळे बळीरामने लगेच शेजाऱ्यांसह पाेलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वास पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले हाेते. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२, ४५२ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अभिषेक अंधारे करीत आहेत.

दारूचे व्यसनकाैटुंबिक वादामुळे संताेषची पत्नी दाेन मुली व मुलाला घेऊन माहेरी गेली हाेती. त्यामुळे तो तीन महिन्यांपासून घरी एकटाच राहात हाेता. संताेषला दारूचे व्यसन हाेते. त्यातच तो काविळने आजारी हाेता. त्यावर गावरान उपाय करीत हाेता. एकटेपणाचा फायदा घेत आराेपींनी त्याच्या खून केला. त्याचा खून नेमका कुणी व कशसाठी केला, या दिशेने पाेलीस तपास करीत असून, आराेपींना हुडकून काढण्यात लवकरच यश येणार असल्याचा विश्वास पाेलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू