मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:05 IST2018-04-13T01:05:12+5:302018-04-13T01:05:27+5:30

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या वर्षात त्यांची ही दुसरी भेट आहे. जानेवारी महिन्यातदेखील त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.

Murali Manohar Joshi's visit to RSS chief | मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

मुरली मनोहर जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

ठळक मुद्देविविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे या वर्षात त्यांची ही दुसरी भेट आहे. जानेवारी महिन्यातदेखील त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती.
विरोधकांकडून भाजपविरोधात घेण्यात आलेला पवित्रा, उत्तर प्रदेशमधील स्थिती आणि तोंडावर असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजपचे जुनेजाणते नेते असलेल्या मुरली मनोहर जोशी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी इतरही कुणी पदाधिकारी होते का हे कळू शकले नाही. यावेळी जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. तसेच संघाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

Web Title: Murali Manohar Joshi's visit to RSS chief