मुरली इंडस्ट्रीजची संपत्ती बँकेशी संलग्न
By Admin | Updated: March 11, 2015 02:19 IST2015-03-11T02:19:33+5:302015-03-11T02:19:33+5:30
बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेने नामांकित मालू समूहाच्या मुरली इंडस्ट्रीज लिमिटेडची संपत्ती थकीत कर्जासाठी संलग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुरली इंडस्ट्रीजची संपत्ती बँकेशी संलग्न
नागपूर : बँक आॅफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेने नामांकित मालू समूहाच्या मुरली इंडस्ट्रीज लिमिटेडची संपत्ती थकीत कर्जासाठी संलग्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पेपर, सिमेंट, केमिकल आणि सॉलव्हंट एक्स्ट्राक्शन हे समूहाचे उद्योग आहेत. या समूहाकडे चार मोठ्या बँकांचे जवळपास १४०० कोटींचे कर्ज थकीत आहे. या सर्व बँकांनी वसुलीसाठी समूहाची प्रॉपर्टी संलग्न केली आहे. सरफेस्ट कायद्यांतर्गत बँकेने कारवाई केली आहे. जर कर्ज वसुली प्रक्रिया अपयशी ठरल्यास बँक संघातर्फे संलग्न केलेल्या प्रॉपर्टी निकाली काढून मुरली इंडस्ट्रीज आणि अन्य कंपन्यांकडून कर्ज वसुली करण्यात येणार आहे.
बँकेच्या या कारवाईविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या रिलिफ अंडरटेकिंग (विशेष तरतूद) कायद्यांतर्गत आपल्याला सूट मिळावी, अशी मागणी करणारी याचिका मालू समूहाने हायकोर्टात दाखल केली होती.
या कायद्यांतर्गत फेब्रुवारी २०१५ पर्यंत समूहाला संरक्षण मिळाले होते. पर्यायी गेल्या आठवड्यात हायकोर्टाने ही याचिका निकाली काढल्यानंतर बँक संघाने कोणताही वेळ न घालविता प्रॉपर्टी बँकेशी संलग्न केली. या समूहांतर्गत मुरली पेपर, मुरली अॅग्रो आणि दोन अन्य कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी काही कंपन्यांची विक्री करून कर्ज परतफेडीचा प्रयत्न समूहाने केला होता. पण त्यात समूहाला यश आले नाही, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)