नगरपालिका उपाध्यक्ष पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:26+5:302021-02-13T04:10:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : स्थानिक विकास कार्यात आडकाठी निर्माण व नगरसेवकांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत नगर परिषदेचे ...

Municipal Vice President Payutar | नगरपालिका उपाध्यक्ष पायउतार

नगरपालिका उपाध्यक्ष पायउतार

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : स्थानिक विकास कार्यात आडकाठी निर्माण व नगरसेवकांशी असभ्य वर्तन करण्याचा ठपका ठेवत नगर परिषदेचे उपाध्यक्ष याेगेंद्र रंगारी यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव घेण्यात आला. हा प्रस्ताव १२ विरुद्ध ५ मतांनी पारित करण्यात आल्याने शेवटी त्यांना उपाध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले.

विकास कामात आडकाठी निर्माण करीत नगरसेवकांशी असभ्य वर्तन करीत असल्याचा आराेप करीत ११ नगरसेवकांनी त्यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव घेण्यासंदर्भात वरिष्ठांकडे अर्ज सादर केला हाेता. यात शिवसेनेच्या तीन, काँग्रेस दाेन व भाजपच्या सहा नगरसेवकांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने या प्रस्तावावर चर्चा करून मतदान घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १२) नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. तशी नाेटीस सर्व नगरसेवकांना पाठविण्यात आली हाेती. त्या नोटिसीमध्ये नमुना अ जोडपत्रात नगर परिषद उपाध्यक्ष याेगेंद्र रंगारी यांच्या विरोधात महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५-१ नुसार नगरसेवकाद्वारे सादर अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यात सभेला हजर राहण्याचे नमूद होते.

नगराध्यक्ष करुणा आष्टनकर या सभेच्या पीठासीन अधिकारी हाेत्या. त्यांच्या उपस्थितीत या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करून हात वर करून मतदान घेण्यात आले. यात काँग्रेसचे नगरसेवक राजेश यादव व कल्पना नितनवरे, शिवसेनेचे नगरसेवक डायनल शेंडे, अनिल ठाकरे, मोनिका पौनिकर, भाजपचे राजेंद्र शेंद्रे व इतर पाच नगरसेविका तसेच नगराध्यक्ष करुणा आष्टनकर यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने तर याेगेंद्र रंगारी यांच्यासह काँग्रेस व एक अपक्ष अशा एकूण पाच नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विराेधात मतदान केले. या सभेला वर्धराज पिल्ले, अतुल हजारे, डाॅ. मनोहर पाठक, छोटू राणे, मनीषा चिखले, शुभांगी घोगले, मुरलीधर येलुरे, सुनील पिल्ले, भरत पगारे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Municipal Vice President Payutar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.