मनपाच्या शिक्षकांना दोन महिन्यापासून वेतन नाही
By Admin | Updated: January 11, 2017 21:11 IST2017-01-11T21:11:50+5:302017-01-11T21:11:50+5:30
नागपूर महापालिका व जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांना शालार्थ प्रणालीद्वारे वेतन दिले जाते. परंतु शासनाकडून वेतन

मनपाच्या शिक्षकांना दोन महिन्यापासून वेतन नाही
dir="ltr">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - नागपूर महापालिका व जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांना शालार्थ प्रणालीद्वारे वेतन दिले जाते. परंतु शासनाकडून वेतन अनुदान न मिळाल्याने गेल्या दोन महिन्यापासून ४९८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना वेतन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
महापालिकेच्या १७ माध्यमिक शाळांतील २९८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शालार्थ प्रणालीद्वारे वेतन दिले जाते. दिवाळीपूर्वी आॅक्टोबर २०१६ मध्ये त्यांना वेतन मिळाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अनुदान न मिळाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे वेतन थांबले आहे.
शिक्षकांना दर महिन्याला वेतन मिळावे, यासाठी शिक्षक उपसंचालकांच्या कार्यालयापुढे महापालिका शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. अशीच अवस्था जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या शाळांतील शिक्षकांची आहे.
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. महापालिकेच्या पदोन्नती समितीने १८ शिक्षकांच्या पदोन्नतीला मंजुरी दिलेली आहे. परंतु निर्णयाची अंमलबजावणी रखडलेली आहे. या संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही.
यातील काही शिक्षक मार्च २०१७ पूर्वी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पदोन्नती न मिळाल्यास सेवा काळात पदोन्नती न मिळताची सेवानिवृत्ती स्विकारावी लागणार आहे.
वेतन न मिळाल्यास आंदोलन....
महापालिकेच्या १७ माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. यामुळे शिक्षकांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. आठवडाभरात वेतन न मिळाल्यास २१ जानेवारीपासून कुटुंंबियासह शिक्षक उपसंचालकांच्या कार्यालयापुढे आंदोलन करू.
- राजु गवरे, अध्यक्ष महापालिका शिक्षक संघ.