नगर परिषदेमुळे विकास कामांना वेग येईल
By Admin | Updated: August 31, 2014 01:15 IST2014-08-31T01:15:00+5:302014-08-31T01:15:00+5:30
राज्यातील आघाडी शासनाने वाडीला नगर परिषदेचा दर्जा प्रदान केला आहे. त्यामुळे स्थानिक विविध विकास कामांना वेग येईल. नागरिकांपर्यंत चांगल्या सुविधा पोहोचविणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी

नगर परिषदेमुळे विकास कामांना वेग येईल
रमेश बंग : राष्ट्रवादी काँग्रेस वाडी शहराच्यावतीने सत्कार
वाडी : राज्यातील आघाडी शासनाने वाडीला नगर परिषदेचा दर्जा प्रदान केला आहे. त्यामुळे स्थानिक विविध विकास कामांना वेग येईल. नागरिकांपर्यंत चांगल्या सुविधा पोहोचविणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बंग यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस वाडी शहराच्यावतीने रमेश बंग यांचा स्थानिक विश्वनाथबाबा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश जयस्वाल, माजी सरपंच भीमराव लोखंडे, माजी उपसरपंच श्याम मंडपे, शहर अध्यक्ष संतोष नरवाडे, सुनंदा ठाकरे, सुरेंद्र मोरे, पुरुषोत्तम कोठे, कृष्णराव तायडे, गणपत रागीट आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बंग म्हणाले, वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी आपण शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन आपल्याला दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. विरोधकांमध्ये केवळ श्रेय लाटण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. असे असले तरी वाडीवासीयांना हा अत्यंत महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. नगर परिषदेमुळे स्थानिक विकास कामांना पुन्हा गती मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला अशोक सिंग, अशोक माने, किताबसिंग चौधरी, तारा घरडे, छाया चोखांद्रे, नीना सोमकुवर, रत्नमाला मल्लेवार, अशोक पैदलवार, मोहन पाठक, विश्वकर्मा, इझार, कमलेश भुरे, योगेश चरडे, प्रवीण लिचडे, दिनेश उईके, गिरधर वाघमारे, देवराव मेश्राम, शशिकांत खोब्रागडे, दत्ता वानखेडे, विजय नंदागवळी, राजू खोब्रागडे, राजेश वानखेडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)