मनपा : एम.एल. कॅन्टीनवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 00:54 IST2021-05-22T00:52:44+5:302021-05-22T00:54:14+5:30
Action on M.L. canteen मनपाच्या एनडीएस पथकाने शनिवारी मोमीनपुरा येथील एम.एल. कॅन्टीन, अनन्या कलेक्शन, अरमन चिकन सेंटर, मदनी चिकन सेंटर आणि के.जी.एन. हॉटेल विरुद्ध कारवाई केली. सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने या दुकानांना सील करण्यात आले

मनपा : एम.एल. कॅन्टीनवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या एनडीएस पथकाने शनिवारी मोमीनपुरा येथील एम.एल. कॅन्टीन, अनन्या कलेक्शन, अरमन चिकन सेंटर, मदनी चिकन सेंटर आणि के.जी.एन. हॉटेल विरुद्ध कारवाई केली. सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने या दुकानांना सील करण्यात आले
मनपाच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी ३१ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करुन २ लाख ५३ हजार रुपयाचा दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वररोड येथील गुरुकृपा किराणा, गुप्ता ट्रेडर्स, पवन ट्रेडर्स या दुकानांना हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत मोमीनपुरामधील एम. एल. कॅन्टीन, अनन्या कलेक्शन, अरमन चिकन सेंटर, मदनी चिकन सेंटर आणि के. जी. एन. हॉटेल या दुकानाला गांधीबाग झोनच्या सहायक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले. पथकाने ५१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.