उच्च न्यायालयात मनपा आयुक्त हजर

By Admin | Updated: July 16, 2015 03:18 IST2015-07-16T03:18:40+5:302015-07-16T03:18:40+5:30

शहरातील विविध प्रार्थनास्थळांमुळे झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Municipal Commissioner in high court attended | उच्च न्यायालयात मनपा आयुक्त हजर

उच्च न्यायालयात मनपा आयुक्त हजर

नागपूर : शहरातील विविध प्रार्थनास्थळांमुळे झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
बुधवारी सुनावणीच्या वेळी नागपूर महानगरपालिकेकडून कोणीही उपस्थित नव्हते. अखेर मनपा आयुक्तांनाच बोलविण्यात यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर काही वेळातच मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व वकील न्यायालयात हजर झाले. अतिक्रमणाविरोधात मनपाने केलेल्या कारवाईची माहिती एक आठवड्याच्या आत देण्याचे आश्वासन मनपाच्या वकिलांनी दिल्यानंतर न्या. भूषण गवई व न्या. इंदिरा जैन यांनी सुनावणी एक आठवड्यासाठी स्थगित केली.
याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. फिरदौस मिर्झा व शासनाकडून सरकारी वकील भारती डांगरे यांनी युक्तिवाद केला.(प्रतिनिधी)

Web Title: Municipal Commissioner in high court attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.