मुंडलेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:34+5:302021-03-08T04:07:34+5:30
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेत मुंडले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत आर्या शेंडे हिने ...

मुंडलेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेत मुंडले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत आर्या शेंडे हिने दोन सुवर्ण, अभिर मानकर याने एक सुवर्ण तर तृप्ती टेकाम हिला एक कास्य पदक प्राप्त झाले. या तीनही विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
................
पोदार स्कूलमध्ये मराठी दिवस
नागपूर : पोदार वर्ल्ड स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा झाला. यावेळी आयोजित विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य भावना डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या सोहळ्यात नाटक, कविता लेखन यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
.........
उच्चशिक्षणासोबतच उद्योगांचीही कास धरा - अनंता इखार
नागपूर : शहरातील तरुण उच्च शिक्षणात गुंतला आहे तर ग्रामीण तरुणांना शेती व्यवसायाची आवड आहे. ग्रामीण तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक होण्याचा विचार करण्याचे आवाहन पायलट मशरूम फार्म व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अनंत इखार यांनी केले. युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मशरूम उत्पादनाबाबत इत्थंभूत माहितीसह बाजारपेठेचे मार्गदर्शन केले.
........
दत्तक प्रक्रिया सुलभ होणार - सुहासिनी देशपांडे
नागपूर : दत्तक विधान प्रक्रिया सोपी, सुलभ आणि सुटसुटीत व्हायला हवी, यासाठी सरकारची यंत्रणा प्रयत्नशील आहे. ही निव्वळ न्यायालयीन प्रक्रिया नसून त्यात मानवी भावनाही गुंतलेल्या असतात. त्यादृष्टीने, कायद्यात बदल-दुरुस्ती प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. अनाथ बालकांना पालक आणि विनाअपत्य पालकांना अपत्य मिळावे, यासाठी कारा अर्थात चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स ही यंत्रणा कार्यरत आहे, असे मत अॅड. सुहासिनी देशपांडे यांनी व्यक्त केले. ‘दत्तक कायदा’ या विषयावर त्या एका खाजगी कार्यक्रमात बोलत होत्या.
.............