शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे येण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांनी घेतला शिस्तीचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:03 IST

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेनागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका मुख्यालयात बघायला मिळाले.

ठळक मुद्देसत्ताधारी व विरोधकांनी केले नियुक्तीचे स्वागत : अतिक्रमण व अवैध बांधकामांना आळा बसण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे सत्तापक्ष व विरोधकांनी स्वागत केले आहे. तर रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका मुख्यालयात बघायला मिळाले.वास्तविक राज्यातील सत्ताबदलापासूनच मुंढे महापालिका आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी त्यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली. मुंढे यांनी नाशिक व नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांच्या विरोधात बडगा उगारला होता. नागपूर जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाºयांना वठणीवर आणले होते. मुंढे यांच्या नियुक्तीमुळे आता पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थाने वचक राहील आणि जनतेची कामे होतील, असे विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी सांगितले. शहरातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असते. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच शहरातील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांना आळा बसेल अशी आशा आहे.प्रशासन व पदाधिकाऱ्यांत समन्वय राहीलमहाराष्ट्र शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ते शिस्तप्रिय असल्याने मनपा प्रशासनालाही शिस्त लागेल. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय राहील, असा विश्वास माजी महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केला. मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल, कर वसुलीच्या माध्यमातून अधिक महसूल मनपा तिजोरीत जमा होईल. शहरातील अतिक्रमणाला आळा बसेल, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी