शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजपचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By योगेश पांडे | Updated: December 13, 2025 14:23 IST

राज्यभरात नागपुरप्रमाणे पट्टेवाटप होणार : समन्वय साधून जागावाटप करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूकीत जास्तीत जास्त संधी मिळावी असे कार्यकर्त्यांना वाटत असते. परंतु महायुती एकत्रित लढत आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांत फार नाराजी आहे असे कुठलेही चित्र नाही. आमच्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविणे हे जास्त महत्त्वाचे आहे. विकासान्मुख व पारदर्शी शासन आणण्यासाठीच आम्ही महायुतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत भाजपचा नव्हे तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शनिवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत विविध दावे करण्यात येत आहेत. मात्र केवळ जिंकणे हाच आमचा फॉर्म्युला राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ५५ जागांची भाजपने मागणी केलेली नाही. तेथे केवळ शिवसेना व भाजप हेच प्रमुख पक्ष आहेत. मागील वेळी भाजपच्या ४२ जागा आल्या होत्या. आम्ही आपापसात बसून जागावाटप करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एकाच घरातील पाच जण पीएचडी करत शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वक्तव्य केले होते. शासनाने ही योजना हुशार मुलांसाठी सुरू केली आहे. एका घरातील पाच लोक योजनेचा लाभ घेतील तर इतर घरांतील गरजू व होतकरू तरुणांना त्याचा लाभ मिळणार नाही. अजित पवार यांचे बोलणे रास्त आहे, असे फडणवीस म्हणाले.

झोपडपट्टी पट्टेवाटपासाठी राज्यभरात ‘नागपूर मॉडेल’

झोपडपट्टीतील लोकांना पट्टेवाटप झाली पाहिजे ही मागील ३० ते ४० वर्षांपासून मागणी होती. २०१४ नंतर आम्ही यासाठी पुढाकार घेतला होता. २०१९ नंतर ही प्रक्रिया थांबवली गेली होती. सत्तेवर परत आल्यावर सगळ्या प्रकारच्या जमिनीवर पट्टेवाटप करता येईल असा निर्णय आम्ही घेतला. एकट्या नागपुरातच ५० हजार लोकांना हे पट्टे देणार असून अडीच लाख लोकांना याचा फायदा होईल. त्यासोबतच सिंधी निर्वासितांना फ्री होल्डची जमीन देत आहोत.

आठ वर्ष सर्वोच्च न्यायालयात लढून झुडुपी जंगलावर वसलेल्यांनादेखील मालकी हक्काचे पट्टे देत आहोत. त्याचे नागपूर मॉडेल तयार केले आहे. त्याला संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे. राज्यात एमएमआर रिजन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या झोपडपट्ट्यांना हा शासन निर्णय लागू असेल. कुणाचे कच्चे घर असेल तर पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी निधी देण्यात येईल. हे पट्टे बॅंकेबल आहेत. त्यांचे विक्री करणे किंवा कर्ज काढणे असे अधिकार पट्टेधारकांना आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया देण्याचेच कामधंदे राहिलेत का ?

संजय राऊत यांनी शासनावर केलेल्या टीकेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया देण्याचेच कामधंदे राहिलेत का असा सवाल केला. कोण काय बोलतो त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मुख्यमंत्री आहे का ? मुख्यमंत्र्याला एवढेच कामधंदे राहिले का ? आमच्या पातळीचे असेल तर आम्ही उत्तरे देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti, Not BJP, Will Win Mumbai Mayor Post: Fadnavis Claims

Web Summary : Devendra Fadnavis asserted MahaYuti will secure Mumbai's mayoral position, prioritizing transparent governance. He addressed seat-sharing for upcoming elections and defended a government scheme's equitable distribution. Nagpur's slum rehabilitation model will be implemented statewide, granting ownership rights and housing assistance. He dismissed responding to Sanjay Raut's criticisms.
टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन