उन्हाळ्यातील गर्दीसाठी मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 21:05 IST2022-03-26T21:04:26+5:302022-03-26T21:05:02+5:30
Nagpur News उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान २ अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

उन्हाळ्यातील गर्दीसाठी मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडी
नागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान २ अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०११०२ मुंबई-नागपूर अतिजलद विशेष रेल्वेगाडी ३ एप्रिलला सायंकाळी ५.४० वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीत तीन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ५ स्लीपर आणि ७ सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहणार आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
.............