शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत मुकबधीर गर्भवतीला कळा; ‘आरपीएफ’ची मदत, प्रसुती सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:58 IST

दिव्यांगांच्या कोचमध्ये महिला तळमळत होती : आरपीएफने दाखवली तत्परता; माता-शिशू दोघेही स्वस्थ.

 नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) राबविण्यात येणाऱ्या 'ऑपरेशन मातृशक्ती' अंतर्गत धावत्या रेल्वे गाडीत प्रसवपिडेने तळमळत असलेल्या एका मुकबधित महिलेला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात दिला. त्यामुळे तिची प्रसुती सुलभ होण्यास मदत झाली. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याने मदत करणाऱ्या महिला-पुरूष आरपीएफ जवानांचे सर्वत्र काैतुक होत आहे.

घटना महाराष्ट्र एक्सप्रेसमधील आहे. सोमवारी ही गाडी गोंदियाहून नागपूरकडे येत असताना दिव्यांगाच्या कोचमध्ये बसलेली एक मुकबधिर गर्भवती महिला प्रसवकळेमुळे तळमळू लागली. कुणीतरी ही माहिती रेल्वेच्या हेल्पलाईनवर कळवली. त्यानंतर ती आरपीएफच्या अधिकाऱ्यांना कळली. ही गाडी काही वेळेतच कामठीला पोहचणार होती. ते लक्षात घेऊन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंंद्र आर्य यांनी सहायक आयुक्त विनोद लांजीवार यांच्या मार्फतीने 'ऑपरेशन मातृशक्ती' राबविणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने पीडित महिलेच्या मदतीला धावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामठी स्थानकावर आरपीएफच्या महिला अंमलदार पिज्मा शर्मा आणि उपनिरीक्षक विजय भालेकर यांनी गाडी कामठीच्या फलाट क्रमांक १ वर थांबताच पीडित महिलेला अलगद उचलून फलाटावरून वाट काढत बाहेर आणले. लगेच एक ऑटो बोलवून त्या महिलेला कामठीच्या रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल होताच या महिलेले एका शिशूला जन्म दिला. तिची आणि बाळाची दोघांचीही प्रकृती चांगली आहे. आरपीएफकडून तात्काळ मायेची उब लाभल्यानेच हे सर्व व्यवस्थित होऊ शकले. दरम्यान, पीडित महिलेला दोन्ही हातात उचलून आरपीएफच्या पिज्मा शर्मा आणि विजय भालेकर धावत-धावत स्थानकाबाहेर जात आहेत, ऑटो बोलवून त्यात तिला रुग्णालयाकडे नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. तेव्हापासून त्यांच्यावर चोहोबाजूने स्तुतीसुमने उधळली जात आहे. भाषेवर भावनांची मातमुकबधिर असल्याने या महिलेला तिच्याशी संबंधित सविस्तर माहिती देता येत नव्हती. मात्र, डॉक्टर आणि आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिला तिच्याकडून संकेतासंकेताने बरिचशी माहिती काढून घेतली. तिच्याजवळ एक आधारकार्ड होते. त्यावरच्या फोटोवरून ते तिचेच असावे आणि तिचे नाव विमला तेलम असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, आरपीएफने तिच्या पतीलाही शोधून काढले असून, तोसुद्धा दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर