म्युकरमायकाेसिस आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:35+5:302021-05-30T04:08:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : काेराेना संक्रमणासह म्युकरमायकाेसिसने रुग्णांच्या चिंतेत भर घातली आहे. काेराेनातून बरे झालेल्यांना या आजाराची लागण ...

Mucormycosis needs timely treatment | म्युकरमायकाेसिस आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे

म्युकरमायकाेसिस आजारावर वेळीच उपचार घेणे गरजेचे

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : काेराेना संक्रमणासह म्युकरमायकाेसिसने रुग्णांच्या चिंतेत भर घातली आहे. काेराेनातून बरे झालेल्यांना या आजाराची लागण हाेत असल्याचे आढळून आले आहे. म्युकरमायकाेसिस हा बुरशी संसर्ग असून, ताे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करताे. यामुळे काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांनी आणखी काही दिवस काळजी घेणे आवश्यक असून, वेळीच उपचार घेणे गरजेचे असल्याचे मत उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी व्यक्त केले.

गट ग्रामपंचायत पिपळा घाेगली येथे म्युकरमायकाेसिस आजाराबाबतची लक्षणे व नागरिकांनी घ्यावयाची दक्षता यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले. या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी नायब तहसीलदार नितीन धाबसे (पाटील), मंडळ अधिकारी दिलीप खुळगे, सरपंच नरेश भाेयर, पंचायत समिती सदस्य वैशाली भाेयर, उपसरपंच प्रभू भेंडे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपुरे, तलाठी विकास सावरकर, आदींची उपस्थिती हाेती. कार्यशाळेत मान्यवरांनी माैलिक मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक ढाेणे, सुनील राहाटे, वनिता कावळे, वैशाली पांडे, मुख्याध्यापक मंडपे, मेश्राम उपस्थित हाेते. कार्यशाळेच्या आयाेजनासाठी अंगणवाडी सेविका प्रेमलता मरसकाेल्हे, शुभांगी मते, ठाकरे, बागडे, दिलीप लेंडे, गिरीश राऊत, मुकेश इंगळे, सुरेश बागडे, आदींनी सहकार्य केले.

Web Title: Mucormycosis needs timely treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.