महावितरणचा मानव संसाधन विभाग झाला हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST2021-06-10T04:06:46+5:302021-06-10T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे ...

MSEDCL's human resources department became high-tech | महावितरणचा मानव संसाधन विभाग झाला हायटेक

महावितरणचा मानव संसाधन विभाग झाला हायटेक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे नुकतेच सुरू केले आहे. त्यामुळे सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत सर्वच २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज या प्रणालीमुळे ऑनलाइन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाले आहे.

ही प्रणाली लागू करण्यापूर्वी महावितरणचे विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळ व्यवस्थापन, पे-रोल, उच्चवेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या. महावितरणच्या मानव संसाधनमधील सॅप-ईआरपीची अंमलबजावणी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचा माहे मे महिन्याचे वेतनाची प्रक्रिया पूर्ण करून सुरू झाली आहे. सॅप ईआरपीमध्ये प्रत्येक क्रिया स्वयंचलितपणे असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचे दावे वेळेवर मिळणार आहेत. या प्रणालीत मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळण्यात येतो. त्यामुळे महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅप-ईआरपी प्रणालीद्वारे आता वेतन, भत्ते व इतर अनुषंगिक फायदे यासारख्या सेवा जलद मिळणार आहेत.

Web Title: MSEDCL's human resources department became high-tech