विजेच्या तक्रारीसाठी महावितरणने सुरू केला नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:13 IST2020-12-05T04:13:55+5:302020-12-05T04:13:55+5:30
लोकमत इम्पॅक्ट नागपूर : वीज गुल झाल्यास आता महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नंबरवर त्याची माहिती देता येणार आहे. कंपनीने ...

विजेच्या तक्रारीसाठी महावितरणने सुरू केला नंबर
लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : वीज गुल झाल्यास आता महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या नंबरवर त्याची माहिती देता येणार आहे. कंपनीने बंद क्रमांक सुरु केले आहेत. तांत्रिक त्रुटीमुळे हा नंबर बंद होता अशी माहिती महावितरणने दिली आहे. याशिवाय ई-मेलवरूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करून वेबसाईटवर ऊर्जा मंत्र्यांच्या निर्देशानुसार दर्शविलेले टोल फ्री बंद असल्याबाबत खुलासा केला होता. यातील एक क्रमांक लँडलाईनचा आहे. त्याचा क्रमांक ०२२-४१०७८५०० आहे. महावितरण या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास वीज गुल झाल्याच्या तक्रारीची नोंद होत असल्याचा दावा करीत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे हा क्रमांक बंद होता असे महावितरणचे म्हणणे आहे. आता हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासोबतच ग्राहकांना डिजिटल पोर्टल, मोबाईल अॅप, मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
............