मिसेस सीएम मनोरुग्णालयात

By Admin | Updated: July 2, 2014 01:00 IST2014-07-02T01:00:44+5:302014-07-02T01:00:44+5:30

प्रादेशिक मनोरुग्णलयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अचानक दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी भेट दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी या भेटीत महिला वॉर्ड आणि पुरुष व महिलांच्या

Mrs CM Hospital | मिसेस सीएम मनोरुग्णालयात

मिसेस सीएम मनोरुग्णालयात

महिला वॉर्ड आणि ओटीची केली पाहणी
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णलयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अचानक दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी भेट दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी या भेटीत महिला वॉर्ड आणि पुरुष व महिलांच्या अ‍ॅक्युप्रेशर थेरपी विभागाची (ओटी) पाहणी केली. विशेषत: कॅन्सरपीडित मनोरुग्ण बिन्ना हिच्या प्रकृतीची चौकशी केली.
मिसेस सीएम यांनी १४ जून रोजी अशीच अचानक मेडिकलला भेट दिली होती. तब्बल पावणेदोन तास त्यांनी अपघात विभागापासून ते विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष असे एकूण २० ठिकाणी भेटी दिल्या. रुग्णांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिष्ठात्यांना दिल्या होत्या. या भेटीनंतर मिसेस सीएम पुन्हा मेडिकलला येणार असल्याची चर्चा होती. परंतु आज अचानक सायंकाळी मनोरुग्णालयाला भेट दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली. मिसेस सीएम आल्या आल्या महिला वॉर्डाकडे वळल्या. तेथील वॉर्डाची स्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या आणि नंतर पुरुषांच्या अ‍ॅक्युप्रेशर थेरपी विभागाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुलसीराम धोटे यांच्या कक्षात त्यांनी रुग्णालयाची माहिती घेतली. मिसेस सीएम यांनी रुग्णालयाच्या स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले. या भेटीत त्यांच्यासोबत उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. प्रवीण नवखरे आणि सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान आदी उपस्थित होते.
‘बिन्ना’ची केली आस्थेने चौकशी
मिसेस सीएम यांनी आपल्या भेटीत कॅन्सरपीडित मनोरुग्ण असलेली बिन्नाची आस्थेने चौकशी केली. बिन्नाच्या आहाराकडे आणि औषधोपचाराकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Mrs CM Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.