कुख्यात शाहरुख विरुद्ध एमपीडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:55+5:302021-03-04T04:13:55+5:30
४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक नागपूर : गुन्हे शाखेने ४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक केली. लक्ष्मण श्यामराव ...

कुख्यात शाहरुख विरुद्ध एमपीडीए
४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक
नागपूर : गुन्हे शाखेने ४४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक केली. लक्ष्मण श्यामराव बोबडे (६२) रा. आवारी चौक वकीलपेठ असे आरोपीचे नाव आहे. अंबाझरी येथील एका प्रकरणात १९७७ पासून तो फरार होता. तो पोलिसांच्या हाती सुद्धा लागत नव्हता. एएसआय विलास चोबीतकर व शिपाई सुजित देव्हारे यांनी जेव्हा तपास केला तेव्हा बोबडे हा वकीलपेठमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने खूप वर्षांपूर्वी त्याचा मित्र नारायण नेवारे व अशोक टेकाम यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्या प्रकरणात बोबडेला अटक झाली होती. टेकामच्या घरी गेल्यावर १९९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. यानंतर बोबडेला अंबाझरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.