नागपुरात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:52 IST2017-12-11T18:50:22+5:302017-12-11T18:52:29+5:30
रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

नागपुरात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेदरम्यान नागपूर शहराच्या प्रवेशद्वारातच खोटारडया सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करुन सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांना शांततेमध्ये आंदोलन करत असताना अटक केली त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत झटापट केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
रास्तारोको आंदोलन करताना नागपूर पोलिसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विदर्भ नेते माजी मंत्री अनिल देशमुख,माजी खासदार आनंद परांजपे,माजी आमदार संदीप बजोरिया आणि अनेक पदाधिकाºयांना अटक केली आणि काहीवेळातच सोडून देण्यात आले.
मात्र पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला चांगलीच दुखापत झाली आहे.