हक्कासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 21, 2015 03:23 IST2015-07-21T03:23:43+5:302015-07-21T03:23:43+5:30
शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेणे, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी,

हक्कासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन
नागपूर : शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेणे, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, पालक, संस्थाचालकांसंदर्भात घेतलेल्या घातक निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष पसरला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे देऊन निदर्शने केली. माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.
एकीकडे २०१३ पासून अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले नाही. दुसरीकडे नियमबाह्य नवीन नियुक्त्यांना मान्यता दिली आहे. प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखालील समितीने एप्रिल २०१५ ला दिलेल्या अहवालात बऱ्याच अटी मराठी शाळेसाठी घातक आहे.
त्यामुळे शिक्षकांच्या सेवा धोक्यात येणार आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात आहे. यासह अन्य मागण्यासाठी शिक्षकांनी धरणे दिले.
धरणे आंदोलनात नागपूर विभागातील शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी प्रमोद रेवतकर, आनंद कारेमोरे, सुधाकर अडबोले, राजेश धुर्वे, सेमदेव टापले, सी.एच. रहांगडाले, अनिल गोतमारे, धनराज राऊत, विठ्ठल जुनघरे, संजय वारकर, अरुण कराळे, दादाराव भगत, विकास गोतमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)