‘माऊथ फ्रेशनर’ जप्त - चार लाखांचा साठा : एफडीएची कारवाई
By Admin | Updated: March 12, 2015 02:40 IST2015-03-12T02:40:26+5:302015-03-12T02:40:26+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी डिप्टी सिग्नल भागात छापा टाकून ३ लाख ९८ हजार ९४० रुपये किंमतीचे ‘माऊथ फ्रेशनर’ जप्त केले.

‘माऊथ फ्रेशनर’ जप्त - चार लाखांचा साठा : एफडीएची कारवाई
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी डिप्टी सिग्नल भागात छापा टाकून ३ लाख ९८ हजार ९४० रुपये किंमतीचे ‘माऊथ फ्रेशनर’ जप्त केले.
डिप्टी सिग्नल भागातील साखरकर वाडीतील मे. जया प्रॉडक्ट्स येथे अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तेथून ‘हसमुख नंबर १’ (माऊथ प्रेशनर) व यासाठी वापरण्यात येणारी सुपारी असा एकूण ३ लाख ९८ हजार ९४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून याचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले. ही कारवाई मुंबईतील दक्षता विभागाचे सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण उमप यांनी केली. प्रतिबंधित तंबाखू मिश्रित पदार्थाची विक्री होत असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशसन विभागास कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच प्रकारची मोहीम पुढच्या काळातही राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)