शहरातील मोकाट कुत्रे बुटीबोरीत !

By Admin | Updated: December 6, 2015 03:04 IST2015-12-06T03:04:27+5:302015-12-06T03:04:27+5:30

बुटीबोरी भागातील औद्योगिक वसाहत परिसरात अचानक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अधिवेशन कालावधीत सिव्हिल लाईन भागात कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी ...

Moukat dogs in the city at Butibori! | शहरातील मोकाट कुत्रे बुटीबोरीत !

शहरातील मोकाट कुत्रे बुटीबोरीत !


नागपूर : बुटीबोरी भागातील औद्योगिक वसाहत परिसरात अचानक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अधिवेशन कालावधीत सिव्हिल लाईन भागात कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी येथील कुत्र्यांना पकडून बुटीबोरी भागात सोडण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. परंतु शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम बंद असल्याने याला आम्ही जबाबदार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच दिवसापूर्वी बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहत परिसरात शांतता होती. रात्री उशिरा कारखान्यातून घरी परतणारे कर्मचारी व कामगार दुचाकी वाहनाने शांततेत येत होते. त्यांना कुठल्याही स्वरुपाची भीती वाटत नव्हती. परंतु आता प्रत्येक गल्लीत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या भटकत आहेत. दुचाकी वाहन दिसताच कुत्रे त्यांच्याकडे धाव घेतात. त्यामुळे घाबरल्याने वाहन चालक खाली पडून जखमी होत आहेत. तसेच कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांची रात्रीची झोप उडाली झाली आहे. पाच दिवसापूर्वी बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरात मोजकेचे कुत्रे नजरेस पडत होते. परंतु अचानक त्यांची संख्या वाढली आहे. (प्रतिनिधी)

नागपुरातील कुत्रे येथे सोडण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)

निविदा काढल्या नाही
नागपूर शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम सध्या बंद आहे. हे अभियान जुलै २०१५ पर्यंतच राबविण्यात आले. मोहिमेदरम्यान पकडण्यात आलेल्या मोकाट कुत्र्यांवर नसबंदी केल्यानंतर त्यांना परत पकडलेल्या भागात सोडण्यात आले. लवकरच ही मोहीम पुन्हा राबविली जाणार आहे. त्यामुळे शहरातील मोकाट कुत्रे पकडून बुटीबोरी भागात सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डॉ. गजेन्द्र महल्ले, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका
आयुक्तासोबतच चर्चा करणार
बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे. महापालिकेकडे कुत्र्यांना पकडणारे पथक आहे. कुत्रे पकडण्याचे काम त्यांचेच आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रास विचारात घेता कुत्र्यांना आवर घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करू.
सुधाकर वाघ
मुख्य अभियंता ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (बुटीबोरी)

Web Title: Moukat dogs in the city at Butibori!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.