मौदा-लापका मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:05+5:302021-09-25T04:09:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यातील माैदा-लापका मार्गावर दुरुस्तीअभावी ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ...

मौदा-लापका मार्ग खड्ड्यात
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : तालुक्यातील माैदा-लापका मार्गावर दुरुस्तीअभावी ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने राेडला डबक्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातील काही खड्डे ज्ञानगंगा विद्यालयाजवळ असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक त्रासले असून, माेठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे.
माैदा-लापका पुढे धामणगाव, आजनगाव, भेंडाळा, मांगली (तेली), सुंदरगाव, चारभा, रेवराल, नांदगाव, कोदामेंढी या माैदा तालुक्यातील माेठ्या गावांना जाेडला आहे. हा मार्ग तालुक्याच्या ठिकाणाला जाेडला असल्याने यासह अन्य गावांमधील नागरिक व विद्यार्थी या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यांना खड्डे व डबक्यांमधून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे वाहने घसरून अपघात हाेत आहेत. शिवाय, वाहनांच्या चाकांमुळे डबक्यांमधील पाणी व चिखल कपड्यांवर उडत असल्याने मनस्तापही सहन करावा लागत आहे.
या खड्ड्यांमधून वाहने जात असल्याने एकीकडे वाहनांचे नुकसान हाेत असून, दुसरीकडे वाहनचालकांना पाठ व कंबरेचाही त्रास उद्भवत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक लाेकप्रतिनिधीला अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असेही नागरिकांनी सांगितले. या मार्गावरील भविष्यातील अपघात टाळण्यासाठी याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी केली आहे.