साई मंदिरासमाेर माेटरसायकल पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:20+5:302021-09-25T04:09:20+5:30
पारशिवनी : शहरातील साई मंदिरासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, ही ...

साई मंदिरासमाेर माेटरसायकल पळविली
पारशिवनी : शहरातील साई मंदिरासमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, ही घटना बुधवारी (दि. २२)सकाळी घडली.
विद्यानंद हेमराज नारनवरे (१८, रा. चिंचभवन, ता. पारशिवनी) याने त्याच्या मालकीची एमएच-४०/एडब्ल्यू-४३८८ क्रमांकाची माेटरसायकल पारशिवनी शहरातील केसरीमल पालीवाल विद्यालयाजवळील साई मंदिरासमाेर उभी ठेवली हाेती. दरम्या, कुणाचे लक्ष नसताना अज्ञात चाेरट्याने ती माेटरसायकल चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्याने पाेलिसात तक्रार नाेंदविली. त्या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार नरेश रामटेके करीत आहेत.