माेटरसायकलींची धडक, दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:21+5:302020-12-02T04:10:21+5:30

काेंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दाेन्ही दुचाकीचालकांचा ...

Motorcycle collision, death of dagha | माेटरसायकलींची धडक, दाेघांचा मृत्यू

माेटरसायकलींची धडक, दाेघांचा मृत्यू

काेंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दाेन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी शिवारात शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

श्रावण लक्ष्मण दुधकवळे (४५, रा. सातनवरी) व कुंटेश्वर किसन मुन्ने (२८, रा. ठाणेगाव, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) अशी मृतांची नावे आहेत. श्रावण दुधकवळे हे त्यांच्या एमएच-४९/एस-९३१६ क्रमांकाच्या माेटरसायकलने नागपूरच्या दिशेने जात हाेते तर, कुंटेश्वर एमएच-३१/बीव्ही-९८०४ क्रमांकाच्या माेटरसायकलने नागपूरहून काेंढाळीच्या दिशेने येत हाेता. सातनवरी शिवारातील यात एक जण राँग साईडने आल्याने दाेन्ही माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली.

यात दाेन्ही दुचाकींचे चालक राेडवर फेकल्या गेले तर कुंटेश्वरच्या हेल्मेटचे तुकडे झाले, शिवाय दाेन्ही माेटरसायकलींची समाेरची चाके तुटली. यावरून दुचाकींच्या धडकेची तीव्रता लक्षात येते. यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाल्याने कुंटेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून श्रावण यांना उपचारासाठी तर कुंटेश्वरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. श्रावण यांचा रविवारी (दि. २९) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Motorcycle collision, death of dagha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.