शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:38 IST

धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारणे मायलेकीच्या जीवावर बेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअजनी रेल्वेस्थानकावरील घटना : चुकीच्या गाडीत बसल्यामुळे उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारणे मायलेकीच्या जीवावर बेतले. यात आईचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर मुंबई एण्डकडील भागात दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.कल्पना किशोर खरवडे (४५) हे मृत आईचे नाव असून रिना किशोर खरवडे (२७) रा. हिवसे भवन, महाल नागपूर असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिराच्या मुलीचे लग्न असल्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी त्या पांढुर्णाला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. त्यांनी पांढुर्णाला जाण्याचे तिकीट घेतले. यावेळी पांढुर्णाला जाणारी जीटी एक्स्प्रेस आणि बल्लारशाकडे जाणारी जीटी एक्स्प्रेस एकाच वेळी नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या. दोघीही मायलेकी चुकीने बल्लारशाकडे जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसमध्ये चढल्या. परंतु गाडी पुढे निघताच त्यांना आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे समजले. घाबरलेल्या अवस्थेत अजनी रेल्वेस्थानकावर जीटी एक्स्प्रेसचा वेग थोडा कमी होताच मुलगी रिनाने उडी मारली. मुलीने उडी मारल्यामुळे तिच्या पाठोपाठ कल्पना यांनीही धावत्या गाडीतून उडी घेतली. यात कल्पना या डोक्याच्या भारावर खाली पडल्यामुळे रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी रिनाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे अजनी रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, परमानंद वासनिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. तर जखमी रिनाला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी रिना शुद्धीवर न आल्यामुळे तिचे बयान नोंदविता आले नाही.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात