‘सासू-सून जोडी नं.१’ शनिवारी

By Admin | Updated: June 24, 2014 01:00 IST2014-06-24T01:00:30+5:302014-06-24T01:00:30+5:30

घर म्हटलं की सासू-सुनेचं नातं हे अग्रस्थानी असतं. सासू आपला हक्क सोडायला तयार नसते आणि नवीन घरात राज्य करायला सून आतूर असते. अशातच खेळीमेळीच्या संसारात भांड्यांचा आवाज यायला लागतो.

'Mother-in-law Jodi No. 1' Saturday | ‘सासू-सून जोडी नं.१’ शनिवारी

‘सासू-सून जोडी नं.१’ शनिवारी

सासू-सून यांच्यासाठी अभिनव स्पर्धा
नागपूर : घर म्हटलं की सासू-सुनेचं नातं हे अग्रस्थानी असतं. सासू आपला हक्क सोडायला तयार नसते आणि नवीन घरात राज्य करायला सून आतूर असते. अशातच खेळीमेळीच्या संसारात भांड्यांचा आवाज यायला लागतो. कधी सासू वरचढ ठरते तर कधी सुनेचा विजय होतो. असेच आंबट-गोड नात्याचे विविध पैलू उलगडणारा ‘सासू सून जोडी नं.१’ या मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम २८ जून रोजी मुंडले सभागृह, रहाटे कॉलनी (अंध विद्यालयाजवळ) दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सासू-सुनांच्या नात्यातील भक्कम आधार शोधून त्यांच्यामध्ये असलेली नात्याची नाजूक विण, त्यामध्ये असलेला हळूवारपणा, अलगद आलेल्या विचारांना सासू-सुनांचा येणारा प्रतिसाद, त्यांच्या नात्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू या सर्व गोष्टी सखी सादर करणार आहेत. ही एक स्पर्धा आहे. यातून उत्कृष्ट सासू-सुनांच्या तीन जोड्यांना विशेष पुरस्कार देण्यात येईल. या अभिनव स्पर्धेत जास्तीतजास्त सासू आणि सुनांनी भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अशी होईल स्पर्धा
पहिल्या फेरीमध्ये सर्वांना एकत्र बसून चर्चा केली जाईल. मनातले विचार मोकळे करण्याची संधी मिळेल. दुसरी फेरी ही ‘मॅचिंग फेरी’ असेल. यात त्यांचे दागिने, कपडे, विचार आदी जुळून येतात का, ते बघितले जाईल. तिसऱ्या फेरीत दोघींना मिळून गाणे, नक्कल, डान्स, अभिनय यापैकी एक सादर करावयाचे आहे. तर चौथ्या आणि शेवटच्या फेरीत परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. एकंदरीत मनोरंजनात्मक अशी स्पर्धा राहील. कार्यक्रमाला शशिकांत बोदड यांचे सहकार्य लाभले आहे. प्रवेश नि:शुल्क आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सखींना सखी मंच कार्यालयात येऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता नेहा जोशी, लोकमत सखी मंच कार्यालय २४२९३५५, ९८५०३०४०३७ तसेच विभाग प्रतिनिधी ज्योती वानखेडे यांचेशी ९७३०२०६८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)

Web Title: 'Mother-in-law Jodi No. 1' Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.