हृदयद्रावक! मुलाच्या कपड्यांना इस्त्री करताना आईला शॉक लागला; मृत्यू
By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 16:35 IST2023-10-10T16:35:09+5:302023-10-10T16:35:37+5:30
या प्रकारामुळे मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

हृदयद्रावक! मुलाच्या कपड्यांना इस्त्री करताना आईला शॉक लागला; मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाच्या कपड्यांना इस्त्री करत असताना वीजेचा शॉक लागून त्याच्या आईचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
राबिया खातून इब्राहीम खान (४०, निराला सोसायटी, मोठा ताजबाग) असे मृतक महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्या आपल्या घरी मुलाच्या कपड्यांना इस्त्री करत होत्या. त्यांना अचानक वीजेचा शॉक लागला व त्या बेशुद्ध झाला. त्यांना कुटुंबियांनी एका खाजगी इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ताज मोईनुद्दीन हमीद अली (४४, मोठा ताजबाग) यांनी दिलेल्या सूचनेवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे राबिया यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरात या प्रकारामुळे शोककळा पसरली आहे.