शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

आईचा पदरच झाला फास !

By admin | Updated: December 1, 2014 00:54 IST

आईच्या साडीमध्ये फसून एका १० वर्षीय मुलीचा करुण अंत झाला. सुरेंद्रनगर येथील धनगरपुरा येथे हा अपघात घडला. राणी अनिलप्रसाद तिवारी असे मृत मुलीचे नाव आहे. राणी खामला येथील सिंधी हिंदी

सुरेंद्रनगरात शोककळा : खेळता खेळता घडली घटना नागपूर : आईच्या साडीमध्ये फसून एका १० वर्षीय मुलीचा करुण अंत झाला. सुरेंद्रनगर येथील धनगरपुरा येथे हा अपघात घडला. राणी अनिलप्रसाद तिवारी असे मृत मुलीचे नाव आहे. राणी खामला येथील सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील खानसामा आहेत. कुटुंबात वडिलांसह आई अर्चना, बहीण लल्ली (७) आणि भाऊ अमन (११) हे आहेत. राणी आणि लल्ली सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये शिकतात तर अमन संस्कार कॉन्व्हेंटमध्ये शिकतो. घटनेच्या वेळी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास अर्चनासह तिघेही घरी होते. घराच्या मागच्या बाजूला शौचालय आहे. सायंकाळी ५ वाजता राणी वस्तीतील इतर मुलींबरोबर ट्युशनला जात होती. ट्युशनला जाण्याची वेळ झाल्याने राणी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बाहेरच तारेवर आईची साडी व इतर दुसरे कपडे वाळू घातले होते. बाथरूममधून बाहेर निघाल्यावर राणी वाळू घातलेल्या साडीत आपला चेहरा लपवून गोल फिरू लागली. साडीत राणीचे तोंड फसल्याने गुदमरून ती बेशुद्ध झाली. दरम्यान, तिच्या गळ्यात साडी फासासारखी आवळल्या गेली. ती स्वत:ला वाचविण्यासाठी तडफडू लागली. तिचा आवाज ऐकून आई धावली. तिची अवस्था पाहून ती मदतीसाठी ओरडू लागली. आरडाओरड ऐकून शेजारीही धावले. शेजाऱ्यांनी राणीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे धनगरपुरा वस्तीत हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)आई प्रचंड मानसिक धक्क्यातट्युशनची वेळ झाल्याने आई अर्चना राणीची वाट पाहत होती. उशीर होत असल्याने तिने राणीची स्कूल बॅगही तयार करून ठेवली होती. राणीचा आवाज ऐकून ती बाहेर धावली. आपलीच साडी मुलीच्या मृत्यूचे कारण बनल्यामुळे अर्चनाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.