शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

नागपुरातील तुंबलेल्या बहुतांश नाल्यांमध्ये आढळले प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:35 AM

शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले.

ठळक मुद्देप्लास्टिकबंदीचे कळले महत्त्वपाणी वाहून जाण्यास अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. त्यामुळे थेट शहरात पूरजन्य आणि आपात स्थिती निर्माण झाली होती. या कारणांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग योग्य वा अयोग्य हे आता नागरिकांनी रस्त्यांवर निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीवरून ठरवावे. काही वर्षांपूर्वी मुंबईत प्लास्टिक नाल्यांमध्ये तुंबल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली होती.पण आता शासनाने २२ जूनपासून प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आणि थर्माकोलपासून तयार केलेले ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे आदीं वस्तूंची विक्री आणि वापरावर बंदी आणली. याच वस्तू शुक्रवारी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्यावर तरंगताना दिसून आल्या.

अनेक भागात प्लास्टिकमुळे पाणी वाहून जाण्यास खोळंबाप्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू नाल्यात तुंबल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. शहरातील अनेक भागात युवकांनी नाल्यांच्या तोंडाशी असलेले प्लास्टिक हटवून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा मोकळी केली. दुपारी १२ च्या सुमारास धंतोली भागातील रेल्वे पुलाखाली नागनदीला पूर आला होता. त्यावेळी पाण्यावरून प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. पुराचे पाणी नदीतून रेल्वे पुलाखालील रस्त्यावर येत असताना पाण्यासोबत प्लास्टिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत होते. शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली, पण नागरिकांनाही तेवढ्याच सजगतेने बंदीचा स्वीकार केला पाहिजे. शुक्रवारी प्लास्टिकने तुंबलेल्या नाल्यांचा बोध नागरिकांना घेण्याची गरज निर्माण झाली आहे.नागरिक दैनंदिन वापराच्या वस्तू छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घरी आणतात आणि उपयोगानंतर सवयीप्रमाणे त्या रस्त्यांवर फेकतात. त्या नंतर नाल्यांच्या तोंडाशी जमा होतात. मुसळधार पावसानंतर त्या नाल्यात फसतात. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जबाबदार आहे.

व्यापाऱ्यांनीही बंदीचा स्वीकार करावाप्लास्टिकबंदीमुळे व्यवसाय बंद पडतील आणि बेरोजगारी वाढले, अशा वल्गना व्यापाऱ्यांनी पावसामुळे घडलेल्या घटनांवरून बोध घेऊन करू नये. किराणा दुकानदारांनी प्लास्टिकचा बंदी कटाक्षाने पाळल्यास ग्राहकसुद्धा कापडी थैल्यांचा उपयोग करतील आणि हळूहळू प्लास्टिक रस्त्यांवर दिसणार नाही तसेच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पूरजन्य स्थिती निर्माण होणार नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी