आॅनलाईन लोकमतनागपूर : दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे. या मॅराथॉनमध्ये भारताचा तिरंगा झळकविण्याचा त्याचा मानस आहे.अतुलकुमार चौकसे एक साहसी युवक आहे. मोहननगरमध्ये तो राहतो. १० ते १२ वर्षांपासून तो रनिंग करतो आहे. तो देशभरात होणाऱ्या २५ ते ३० मॅराथॉनमध्ये सहभागीसुद्धा झाला आहे. जीवनात काही तरी थ्रील करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या अवघड मॅराथॉनमध्येसुद्धा तो सहभागी झाला आहे. अतुलने लडाखमध्ये होणाऱ्या खरडुंगा चॅलेंज या ७२ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही मॅराथॉन समुद्रसपाटीपासुन १८,५०० किलोमीटरवर असते. देशातील सर्वात अवघड मॅराथॉन म्हणून नोंद आहे. येथे प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्यामुळे स्पर्धा पूर्ण करणे अनेकांना शक्य होत नाही. त्याचबरोबर लडाख येथील ४२ किलोमीटरची मॅराथॉन, बंगलोर येथे झालेली ७५ किलोमीटरची अल्ट्रा मॅराथॉनमध्ये तो धावला आहे. त्यात तिसरा रँक त्याने मिळविला आहे. त्याचबरोबर नागपूर-छिंदवाडा, नागपूर-अमरावती अशा १०६, १०४ किलोमीटर अंतर त्याने धावून पार केले आहे.अतुलचे हे साहसी अनुभव लक्षात घेता, त्याने जगातील सर्वात कठीण असलेली सहारा वाळवंटातील एमडीएस मॅराथॉन पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ही मॅराथॉन अतिशय थरारक असून, त्यासाठी त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जगातील सर्वात कठीण सहाराचा वाळवंट अतुलला करायचाय पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 19:14 IST
दक्षिण आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात दरवर्षी जगातील सर्वात कठीण मॅराथॉन आयोजित केली जाते. एप्रिल २०१८ मध्ये ही ३३ वी मॅराथॉन होत आहे. यात अजूनपर्यंत एकाही भारतीयाने सहभाग नोंदविला नाही. वाळवंटातील २५० किलोमीटरची ही मॅराथॉन पार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती नागपुरातील अतुलकुमार चौकसे याने बाळगली आहे.
जगातील सर्वात कठीण सहाराचा वाळवंट अतुलला करायचाय पार
ठळक मुद्दे३२ वर्षांत एकही भारतीय धावला नाही