हनुमानगर व नेहरूनगरमध्ये सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:03+5:302021-04-20T04:08:03+5:30
लक्ष्मीनगर, नेहरूनगर, धंतोली व मंगळवारी झोनमध्ये परिस्थिती गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील ...

हनुमानगर व नेहरूनगरमध्ये सर्वाधिक मृत्यू
लक्ष्मीनगर, नेहरूनगर, धंतोली व मंगळवारी झोनमध्ये परिस्थिती गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील परिस्थिती गंभीर बनली आहे. झोननिहाय पॉझिटिव्ह रुग्ण विचारात घेता हनुमाननगर, लक्षमीनगर, धंतोली, नेहरूनगर व मंगळवारी झोन क्षेत्रात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. मागील चार दिवसांत हनुमाननगर व नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी २९ जणांचा मृत्यू झाला. शहरातील अन्य झोनच्या तुलनेत या दोन झोनमधील मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे.
चार दिवसांतील संक्रमितांचा विचार करता हनुमानगर झोनमधील स्थिती चिंताजनक आहे. चार दिवसात या झोनमध्ये सर्वाधिक २९७० पॉझिटिव्ह आढळून आले. दुसऱ्या क्रमांकावर २५९८ रुग्णांसह लक्ष्मीनगर तर तिसऱ्या क्रमांकावरील नेहरूनगर झोनमध्ये २४०७ रुग्ण आढळून आले.
विशेष म्हणजे काेविडच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या सतरंजीपुरा व गांधीबाग झोनमध्ये यावेळी सर्वात कमी रुग्ण आहेत. सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वात कमी ४४५ तर गांधीबाग झोनमध्ये ९९० रुग्ण आढळून आले आहेत. असे असले तरी शहरातील सर्वच भागात संक्रमण व मृत्यूचा आकडाही दररोज वाढत आहे. संक्रमण चेन ब्रेक करण्याची गरज असून यासाठी कान्टॅक्ट ट्रेसिंग व हॉटस्पॉट असलेल्या भागात कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे. नागरिकांनाही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय संक्रमण थांबणार नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक संक्रमण असलेल्या भागात यावेळी रुग्णांची संख्या कमी आहे. तर ज्या भागात सर्वात कमी संक्रमण होते अशा भागात दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून येताहेत.
....
सोमवारी झोननिहाय आढळलेले रुग्ण व मृत्यू
लक्ष्मीनगर ७३१ १२
धरमपेठ ४४८ ०८
हनुमाननगर ८९३ १४
धंतोली ४१३ १२
नेहरूनगर ६३७ १२
गांधीबाग २२० ०३
सतरंजीपुरा ११० ०१
लकडगंज २७७ ०४
आसीनगर ३६४ ०२
मंगळवारी ४८५ ०७
एकूण ४५७८ ७५