शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पोलीस, महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 20:19 IST

२०१९ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई११ महिन्यांत एकूण ९८ लाच प्रकरणे, १२५ अधिकारी-कर्मचारी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१९ मधील पहिल्या ११ महिन्यांत एकूण ९८ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. दर महिन्याची आकडेवारी सरासरी ९ इतकी होत आहे. मागील वर्षी हीच सरासरी प्रति महिना १० इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. विशेष २०१९ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१९ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्याआकडेवारीनुसार २०१९ मध्ये वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत ९८ सापळा प्रकरणांमध्ये १२५ आरोपी अडकले. त्यांच्याकडून ९ लाख ७६ हजार ७०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये महसूल विभागातील २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर पोलीस विभागातील २६ जणांवर कारवाई झाली. याशिवाय जिल्हा परिषदेतील १०, एमएसईबीतील ८, शिक्षण विभागातील ९, पंचायत समितीमधील ६, खासगी क्षेत्रातील ८ जणांवर कारवाई झाली.‘क्लास वन’चे ६ अधिकारी सापळ्यात१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत एकूण ६ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात महसूल विभागातील ३, तर ‘आयटीआय’, ग्रामविकास व शिक्षण विभागातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश होता. तर दुसºया श्रेणीतील १२ जणांवर कारवाई झाली. तृतीय श्रेणीतील ७५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.९५ महिन्यांत ९१५ प्रकरणे२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ९१५ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र त्यानंतर एकूण सापळ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.दोषसिद्धीची टक्केवारीवर्ष            शिक्षेची टक्केवारी२०१५       २० %२०१६       १५ %२०१७      २४ %२०१८       १६ %२०१९ (नोव्हेंबरपर्यंत) १३ %वर्षनिहाय प्रकरणेवर्ष        प्रकरणे२०१२    ५१२०१३    ७२२०१४    १५५२०१५    १७३२०१६    १३५२०१७    ११०२०१८   १२१२०१९ (नोव्हेंबरपर्यंत) ९८श्रेणीनिहाय लाचखोर @ २०१९श्रेणी        आकडावर्ग १         ६वर्ग २         १२वर्ग ३         ७५वर्ग ४        ५इलोसे       ११खासगी     १६दोषसिद्धीचा दर कमीचलाच घेताना अडकलेल्यांना न्यायालयात शिक्षा मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या केंद्रांवर २०१९ मध्ये १३ टक्के आरोपींना शिक्षा झाली. २०१८ मध्ये हेच प्रमाण १६ टक्के इतके होते, तर २०१७ मध्ये २४ टक्के आरोपींना शिक्षा झाली होती.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता