शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या कोरडी भागात शेतकऱ्यांसाठी ‘मॉर्निंग वॉक’ ठरतेय डोकेदुखी  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:23 IST

सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीमालाची चोरी वाढली : घोगली येथील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूत नेटवर्कनागपूर  : सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत.कोराडी व परिसरातील काही गावांमधील नागरिक घोगली शिवारात रोज सकाळी फिरायला जातात. यातील काही हौशी मंडळी रोडलगतच्या शेतांमध्ये शिरतात आणि शेतातील हरभरा, मेथी, पालक, गाजर यासह अन्य भाजीपाला चोरून नेतात. घोगली येथल हरिभाऊ देवमन भांगे यांची शेती रोडलगत आहे. त्यांनी बाजारात विक्रीला नेण्यासाठी शेतातील मेथी गुरुवारी सायंकाळी उपटून शेतातच ठेवली होती. दुसऱ्या  दिवशी सकाळी (शुक्रवारी) फिरायला येणाऱ्यांनी ही मेथी चोरून नेली. ही मंडळी रोज सकाळी हातात मावेल इतका हरभरा उपटून नेत असल्याचेही हरिभाऊ भांगे यांनी सांगितले.सध्या या परिसरात असलेल्या तलावाचे पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यात तलावाची पाळ उंच व रुंद करण्यात आली. ही पाळ नांदा व कोराडी येथील नागरिकांसाठी ‘मॉर्निंग वॉक’च्या दृष्टीने पर्वणी ठरल्याने या भागात फिरायला येणाऱ्या  नागरिकांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. या भागातील शेतकरी भाजीपाल्याची पिके घेत असून, ते आधी भाजीपाला उपटून ठेवतात आणि दुसऱ्या  दिवशी विक्रीला नेतात. शुक्रवारी सकाळी या भागात फिरायला जाणाऱ्यांपैकी बहुतेकांच्या हातात मेथी दिसत आल्याची माहिती काहीं प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, याला आळा घालणार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर