सकाळी स्लो, सायंकाळी फ्लो

By Admin | Updated: October 16, 2014 00:58 IST2014-10-16T00:58:13+5:302014-10-16T00:58:13+5:30

दक्षिण विधानसभा मतदारसंघात काही किरकोळ घोळ वगळता बुधवारी शांततेत ५७ टक्के मतदान झाले. ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने काहींना मतदानापासून वंचित राहावे लागले.

Morning, morning flows | सकाळी स्लो, सायंकाळी फ्लो

सकाळी स्लो, सायंकाळी फ्लो

नागपूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात काही किरकोळ घोळ वगळता बुधवारी शांततेत ५७ टक्के मतदान झाले. ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने काहींना मतदानापासून वंचित राहावे लागले. सर्वच मतदान केंद्रावर महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. त्यांच्यात उत्सुकता होती. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली.परंतु ९ च्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे दुपारी १२ पर्यत मतदानाची गती मंदावली. पावसाच्या व्यत्ययामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला..पावसामुळे उमेदवारांच्या बुथवरील कार्यक र्त्यांची तारांबळ उडाली. पावसाने उसंत घेतल्यानंतर मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे दुपारी ३ नंतर बहुसंख्य मतदान केंद्रावर गर्दी वाढली. मतदारांच्या लागलेल्या रांगा सायंकाळी ६ पर्यंत कायम होत्या. बेसा रोडवरील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा, शाहू नगर येथील जे.एम.निंबाळकर कॉलेज, हुडकेश्वर रोडवरील मातोश्री लक्ष्मीबाई उच्च प्राथमिक विद्यालय, गजानन शाळा, बाभुळखेडा येथील मानवता प्राथमिक शाळा, डॉ .बाबासाहेब आंबेडकर कॉलेज , इंदिरा गांधी हायस्कूल, हनुमानगर झोन कार्यालय,हनुमाननगर येथील लालबहादूर शास्त्री, तनिष्क नर्सिंग स्कूल, प्रगती विद्यालय प्रगतीनगर, विद्या भूषण प्रा. शाळा श्रीहरीनगर, सिद्धेश्वर स्कूल मानेवाडा यासह बहुसंख्य मतदान केंद्रावर सायंकाळी मतदारांनी गर्दी केली होती.पावसामुळे अनेक मतदार घराबाहेर न पडले नाही. काहींनी गर्दीमुळे मतदान करण्याचे टाळले. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीत मतदारात प्रचंड उत्साह होता. परंतु यावेळी तो दिसला नाही. दोन ठिकाणी बोगस मतदानाच्या घटना घडल्या. दुसऱ्याच्या नावावर मतदान केले. त्यामुळे खऱ्या मतदारांचे बॅलेटवर मतदान नोंदवून घेण्यात आले. मतदान केंदाबरील बुथची जबाबदारी प्रामुख्याने तरुणांवर सोपविण्यात आली होती. यात तरुणींचाही सहभाग होता. त्यांच्यात उत्साह दिसत होता. यादीतील नाव शोधून मतदारांना अनुक्र्र मांक व मतदान केंद्राची माहिती देत होते.
उमेदवारांनी घेतला अंदाज
दक्षिण विधानसभा मतदार संघात तुल्यबळ पाच उमेदवार उभे असल्याने विजयासाठी सर्वच उमेदवारांनी गेल्या १५ दिवसात जीवाचे रान केले. परंतु आपल्या भाग्याचा फैसला मतदारांच्याच हाती आहे याची जाणीवही त्यांना आहे. सर्वांनाच विजयाची आशा असली तरी एकाचाच विजय होणार असल्याने मतदारांच्या कौलाचा कानोसा घेण्यासाठी प्रमुख उमेदवार आपल्या समर्थकांसह मतदार संघात फिरत होते. बुथला भेटी देतानाच माहिती जाणून घेत होते. काहींनी आपल्या बुथवरील मतदारांच्या गर्दीवरून कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.कार्यक र्त्यांशी चर्चा करून वस्तीत कुणाचा जोर होता याची माहिती जाणून घेतली. परंतु मतदारांच्या मनात नेमके आहे. याचा उलगडा १९ आॅक्टोबरला मतमोजणीनंतरच होणार आहे. हेही तितकेच खरे.
दुपारनंतर उसळली मतदारांची गर्दी
मतदान केंद्रांची संख्या वाढली. प्रत्येक केंद्रावरील मतदारांची संख्याही मर्यादितच. त्यामुळे मतदानासाठी गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा होती. परंतु सकाळी अचानक पाऊ स झाल्याने दुपारी १ वाजपर्यत मतदारांची संख्या रोडावली होती. पाऊ स थांबल्याने दुपारी २ नंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले.त्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी वाढली होती. काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यात महिलांची संख्या अधिक होती. अचानक गर्दी वाढल्याने काही मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. विशेषत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी उच्च माध्यमिक शाळा, शाहू नगर येथील जे.एम.निंबाळकर कॉलेज, हुडकेश्वर रोडवरील मातोश्री लक्ष्मीबाई उच्च प्राथमिक विद्यालय, गजानन शाळा, बाभुळखेडा येथील मानवता प्राथमिक शाळा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज , इंदिरा गांधी हायस्कूल, हनुमानगर झोन कार्यालय,लालबहादूर शास्त्री हनुमाननगर, तनिष्क नर्सिंग स्कूल, प्रगती विद्यालय प्रगतीनर, विद्या भूषण प्रा. शाळा श्रीहरीनगर, सिद्धेश्वर स्कूल मानेवाडा यासह बहुसंख्य मतदान केंद्रावर सायंकाळी मतदारांनी गर्दी केली होती. लोकसभा निवडणुकीत मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यत होती. परंतु विधानसभेसाठी ६ वाजेपर्यंत करण्यात आली होती. पावसामुळे सकाळी मतदान करता न आल्याने अनेकांनी सायंकाळी मतदान केंद्र गाठले. नियमानुसार सायंकाळी ६ वाजता सर्वच मतदान केंद्रावरील मुख्य व्दार बंद करण्यात आले. यावेळी मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या होत्या. ज्यांच्याकडे चिठ्ठ्या होत्या त्यांनाच सहानंतर मतदान करू दिले. काही केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यत मतदार रांगेत उभे होते.
दोन ठिकाणी बोगस मतदान
मतदान यादीवर छायाचित्र असूनही जवाहरनगर आणि कैलासनगर भागात दोन महिलांनी बोगस मतदान केल्याच्या घटना घडल्या. जवाहरनगरच्या मार्ग क्रमांक ४ येथील इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळेत ११६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात हा प्रकार घडला. यशोधरा दहिवाले ही महिला मतदान करण्यासाठी गेली असता तिचे मतदान आधीच कुणीतरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.नगरसेवक किशोर गजभिये यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर तिला मतदानासाठी बॅलेट पेपर देण्यात आला. दुसरा प्रकार घडला तो कैलासनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात. अनिता भीमराव मेश्राम या महिलेच्या नावावरही आधीच कुणीतरी मतदान केले होते. यावर आक्षेप घेतल्यानंतर तिला मतदानासाठी बॅलेट पेपर देण्यात आला.

Web Title: Morning, morning flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.