ग्रामीण भागात आता सतराशेहून अधिक बेड उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:14+5:302021-04-18T04:07:14+5:30
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, ग्रामीण भागात आता एकूण १७८२ बेडची व्यवस्था करण्यात ...

ग्रामीण भागात आता सतराशेहून अधिक बेड उपलब्ध
नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, ग्रामीण भागात आता एकूण १७८२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
गतवर्षी एकूण १३५६ बेड होते. त्याजागी आता साधारणतः ४३६ बेड वाढविण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील एकूण ३१ रुग्णालयांमध्ये २०३ साधे बेड, १२४७ ऑक्सिजन बेड, तर ८८ व्हेंटिलेटरसह उपलब्ध असलेले बेड आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये ५१३ बेड आहेत.
शुक्रवारी शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता, जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी डॉक्टर व तज्ज्ञ चमूने जागेची पाहणी केली. शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार शनिवारी ग्रामीण भागातील १७९२ बेडचे व्यवस्थापन करण्यात आले.
ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी सुमारे ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेऊन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादकांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे.