शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:09 IST

पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.

ठळक मुद्देआदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपड्या हटविण्यासाठी नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ४२७ झोपडपट्ट्या आहेत. यातील जवळपास २९८ नोटिफाईड झालेल्या आहेत. विशेष म्हणगजे शहरातील नाल्याच्या काठावर ५० हून अधिक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यात एक लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.आदर्श नगर नाल्यांची काही दिवसापूर्वी संरक्षण भिंत पडली. या भिंती लगतच्या काही घरांना धोका निर्माण झाला. या नागरिकांनी स्वत:हून आपली घरे सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु मनपाच्या अतिक्रमण विभागाने तीन झोपड्या पोलिसांच्या मदतीने हटविल्या, तसेच काठावरील अन्य झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण घेण्यासंदर्भात नोटीस बजावली. आदर्श नगर ही झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना मनपा प्रशासनाने मालकी हक्क पट्टे वाटप केले आहे. असे असतानाही अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील झोपडपट्टीधारकांत दहशतीचे वातावरण आहे.पावसाळा आला की मनपा प्रशासनातर्फे नदी-नाले काठावरील झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटविणे योग्य नाही. याची जाणीव असूनही अशा स्वरूपाच्या नोटीस बजावल्या जातात.आधी पुनर्वसन नंतर कारवाई करादेशातील कोणताही नागरिक बेघर राहणार नाही, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यातूनच पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले जात आहे. असे असतानाही झोपडपट्टीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर अतिक्रमण हटवा, अशी मागणी झोपडपट्टीधारकांनी केली आहे. तर प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी दिला आहे.कारवाईपूर्वी पुनर्वसन कराआदर्श नगर झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. नाल्याची भिंत जीर्ण झाल्याने धोका असलेल्या घरमालकांनी स्वत:हून घरे पाडण्याची तयारी दर्शविली.परंतु मनपाच्या अधिकाऱ्­यांनी धोका असलेली इमारत न पडता बाजूच्या झोपड्या पाडल्या. अन्य घरांनाही नोटीस बजावल्या. झोपडपट्टीधारकाचे पुनर्वसन न करता नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा.दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसमनपाची कारवाई अन्यायकारकआदर्श नगर स्लम नोटीफाईड आहे. येथील लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी केलेले बांधकाम अधिक्रमण ठरवून नोटीस बजावणे योग्य नाही मनपा प्रशासनाने आधी त्यांचे पुनर्वसन करावे नंतरच कारवाई करावी.अ‍ॅड. यशवंत मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक.कोरोना विस्थापित करणे अयोग्यकोरोनामुळे सर्वजण संकटात आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत.अशा परिस्थितीत झोपडपट्टीधारकांना विस्थापित करणे योग्य नाही. आधी त्यांची पुनर्वसनाची व्यवस्था करावी नंतरच प्रशासनाने कारवाई करावी.अनिल वासनिक, संयोजक विकास मंचकारवाई नियमानुसारचबांधकाम नकाशा मंजूर केल्याशिवाय मालकीहक्क पट्टे वाटप करता येत नाही. झोपडपट्टीधारकांनी आधी बांधकाम मंजूर करून घेणे अपेक्षित होते. परंतु तसे केले नाही. ६०० फुटाऐवजी अनेकांनी २ हजार चौरस फूट जागेत दोन मजली घरे उभारली. आदर्श नगर नाल्याची भिंत कोसळली. बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर यासाठी मनपालाच दोषी धरले जाईल. त्यामुळे कारवाई योग्यच आहे.महेश मोरोणे उपायुक्त मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका