शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जलतरणात आमूलाग्र सुधारणा करण्याची अधिक गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:57 IST

भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देआॅलिम्पिकपटू संदीप सेजवालचे मत

आॅनलाईन लोकमतनागपूर: भारतीय जलतरणपटूंकडून आंतरराष्ट्रीय  पातळीवर चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगायची झाल्यास भारतीय जलतरण क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आॅलिम्पिकपटू संदीप सेजवाल याने सोमवारी व्यक्त केले.एका समारंभासाठी पहिल्यांदा नागपुरात आलेला २०१४ च्या आशियाडचा कांस्य विजेता सेजवालने एसजेएएनतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात जलतरणातील समस्या आणि उपाययोजना यावर मत नोंदविले.जलतरणातील सद्यस्थितीवर बोलताना तो म्हणाला,‘आधीच्या तुलनेत भारतीय जलतरणपटू सध्या चांगली कामगिरी करीत आहेत. मागील दोन आशियाडमध्ये आम्हाला पदके मिळाली, पण सुधारणा घडून येण्यास आणखी वेळ लागेल. मूळचा दिल्लीचा असलेला संदीप सेजवाल सध्या बेंगळुरू येथे पुढीलवर्षी जकार्ता येथे आयोजित आशियाडची तयारी करीत आहे.सुधारणा घडून येण्यासाठी देशात स्पर्धांची संख्या वाढविण्याची गरज आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत आपल्याकडे स्पर्धांची संख्या नगण्य आहे. केवळ राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन पुरेसे नाही, असे ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकचा राष्ट्रीय विक्रमवीर आणि सिनियर राष्ट्रीय विजेता असलेल्या सेजवालने सांगितले. जलतरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय भारतात या खेळाचा दर्जा उंचावणार नाही. खेळाडूंना नोकऱ्यांची संधी आणि आर्थिक मदतीचा अभाव ही देखील खेळाच्या माघारीची प्रमुख कारणे आहेत.१८ वर्षांखालील गटाच्या स्पर्धांना ग्लेनमार्कने शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळे ज्युनियर स्तरावर आशेचा किरण जगताना दिसत आहे. यातून देशाला आॅलिम्पिक दर्जाचे जलतरणपटू गवसतील, असा विश्वास पश्चिम रेल्वेचा कर्मचारी असलेला सेजवाल याने व्यक्त केला.पॅराजलतरणात विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती कांचनमाला पांडे हिच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. तत्पूर्वी रातुम नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग संचालिका डॉ. कल्पना जाधव आणि शहरातील जलतरण संघटकांनी सेजवालचे स्वागत केले.

टॅग्स :Sportsक्रीडाnagpurनागपूर