शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात ८० ‘मि.मी.’हून अधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:08 IST

मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ठळक मुद्देनागपुरात संततधार : पावसामुळे सुखावला बळीराजा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सोमवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यानंतर पहाटेपासून परत पावसाला सुरुवात झाली. विदर्भात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १२७ ‘मि.मी.’पावसाची नोंद झाली. तर गोंदियामध्ये सर्वात कमी म्हणजे १८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसामुळे विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमानाचा पारादेखील खाली गेला आहे. नागपुरात कमाल २५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ५ अंशाने कमी आहे.नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मौदा तालुक्यात झाला. तेथे २६२.८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून धान, सोयाबीन, कापूस पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पांत क्षमतेच्या ५५.७० टक्के पाणीसाठा आहे. तर मोठ्या प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ३१ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर