चंद्रही उजळला बुद्धाच्या साथीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST2021-05-27T04:09:12+5:302021-05-27T04:09:12+5:30

चिरपरिचित अविचल शांत मुद्रा जेव्हा सांगितली जाते, तेव्हा आपसुकच नजरेपुढे येते ते तथागत गौतम बुद्धांचे रूप. शांतीचा, समतेचा संदेश ...

The moon also shone with the Buddha | चंद्रही उजळला बुद्धाच्या साथीला

चंद्रही उजळला बुद्धाच्या साथीला

चिरपरिचित अविचल शांत मुद्रा जेव्हा सांगितली जाते, तेव्हा आपसुकच नजरेपुढे येते ते तथागत गौतम बुद्धांचे रूप. शांतीचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागताचे अस्तित्व ही भारतीय संस्कृतीने जगताला दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. जन्म, बुद्धत्त्व प्राप्ती अन् निर्वाण हा एक दुर्मीळ असा संयोग आहे आणि तो गौतम बुद्धाने साकारला. या संयोगाचा सोहळा साजरा करण्यासाठी ब्रह्मांडाने आजही एक अपरिमित असा योग जुळवून आणला. नो शॅडो डे, पृथ्वीजवळचे चंद्राचे कमी झालेले अंतर आणि त्यायोगे सूर्यकिरणांच्या उत्सर्जनाने प्राप्त झालेले लाल रंग अर्थात रेड मून, बुद्ध जयंतीचा सोहळा साजरा करत आहेत. चंद्राचे पांढरेभोर रूप शांतता प्रदान करते आणि चांदणे शीतलता तर बुद्ध अविचल समाधी वृत्तीचे तत्त्व व्यक्त करते. आध्यात्मिक साधनेचा हा संयोग मनोरम वाटतो.

छायाचित्र - मुकेश कुकडे

Web Title: The moon also shone with the Buddha