रेल्वेगाड्यांतील भोजन व स्वच्छतेचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:35+5:302021-09-26T04:08:35+5:30
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार रेल्वेगाड्यांतील स्वच्छता, पेंट्रीकारमधील खाद्यपदार्थांचा दर्जा, रेल्वेस्थानकावरील ...

रेल्वेगाड्यांतील भोजन व स्वच्छतेचे निरीक्षण
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार रेल्वेगाड्यांतील स्वच्छता, पेंट्रीकारमधील खाद्यपदार्थांचा दर्जा, रेल्वेस्थानकावरील चहा स्टॉल्स आदींची पाहणी करण्यात आली.
प्रवाशांना गुणवत्तापूर्ण भोजन आणि चांगल्या प्रतीचे खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कंबर कसली आहे. स्वच्छता पंधरवड्याच्या नवव्या दिवशी स्वच्छ भोजन या संकल्पनेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्य केले. त्यानुसार रेल्वेगाड्यांतील पेंट्रीकार आणि रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉल, फूड प्लाझामधील स्वच्छता, भोजनाची गुणवत्ता राखण्यासाठी निरीक्षण करून योग्य त्या सूचना केल्या. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२६२६ केरळा स्पेशल, ०२६२१ तामिळनाडू स्पेशल, ०२६१५ जीटी स्पेशलमधील पेंट्रीकारचे निरीक्षण करून पेंट्रीकारमध्ये स्वच्छता राखण्याबाबत सल्ला देण्यात आला. तसेच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची पाहणी करून भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. स्वच्छता पंधरवडा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून यात प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
............