शस्त्राच्या धाकावर राेख रक्कम पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:21+5:302021-01-08T04:22:21+5:30
बुटीबाेरी : बंद असलेल्या हाॅटेलमध्ये रमी खेळायला गेलेल्या तरुणावर तिघांपैकी एकाने अग्निशस्त्र राेखले आणि दुसऱ्याने त्याच्याकडील पाच हजार रुपये ...

शस्त्राच्या धाकावर राेख रक्कम पळविली
बुटीबाेरी : बंद असलेल्या हाॅटेलमध्ये रमी खेळायला गेलेल्या तरुणावर तिघांपैकी एकाने अग्निशस्त्र राेखले आणि दुसऱ्याने त्याच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सातगाव येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
हर्षल विनाेद पिंपळकर (२६, रा. फ्रेंड्स काॅलनी, बुटीबाेरी) हा मित्रांसाेबत सातगाव येथील बंद असलेल्या वैशिष्ट कांबळे, रा. शिरूळ याच्या हाॅटेलमध्ये रमी खेळायला गेला हाेता. तिथे आधीच सहा जण हजर हाेते. हर्षलने आत प्रवेश करताच चेहऱ्याला दुपट्टा बांधलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्यावर अग्निशस्त्र राेखले. दुसऱ्याने त्याच्याकडील पाच हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर तिघांनीही एमएच-४९/बी-७९८८ क्रमांकाच्या कारने बुटीबाेरीच्या दिशेने पळ काढला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ३९२, ३४२, ४५२, ३४ तसेच आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक भारती करीत आहेत.