लग्नसोहळ््यात पैशांची उधळपट्टी योग्य नाही
By Admin | Updated: March 4, 2017 02:15 IST2017-03-04T02:15:34+5:302017-03-04T02:15:34+5:30
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही लग्नावरून नवा वाद सुरू झाला आहे.
लग्नसोहळ््यात पैशांची उधळपट्टी योग्य नाही
मा. गो. वैद्य : दानवेंवर अप्रत्यक्ष टीका
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या शाही लग्नावरून नवा वाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ संघ विचारक मा. गो. वैद्य यांनी यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पैशांची उधळपट्टी अयोग्य असल्याचे ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमध्ये बुरख्याचा गैरवापर करून कदाचित पुरुष मतदान करत असल्याचा अनुभव भाजपला आला असेल, अशी प्रतिक्रिया देत संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी एक प्रकारे भाजपच्या मागणीला पाठिंबाच दिला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बुरखाधारी महिलांचा महिला पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. बुरख्याचा वापर करून बोगस मतदान होत असल्याचा अनुभव भाजपला आल्याने त्यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष याकडे वेधण्यासाठी हे पत्र लिहिले असावे, असेही वैद्य म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा राष्ट्रवादी तर कम्युनिस्टांची जागतिक विचारधारा असल्याचे सांगत हा विचारधारेचा संघर्ष आहे. संघाची विचारसरणी पटत नसल्याने कम्युनिस्ट हिंसक कारवाया करत असल्याचा आरोप मा.गो. वैद्य यांनी केला. या घटनांमागे तेथील कम्युनिस्ट सरकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कम्युनिस्ट नेते शत्रू नंबर एक असल्याचे मानतात, त्यामुळेच केरळात स्वयंसेवकांवर जीवघेणे हल्ले, कार्यालयावर बॉम्ब हल्ले करण्यासारख्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोपही वैद्य यांनी केला आहे. गुरुवारी कोच्ची येथील संघाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध त्यांनी यावेळी केला. दरम्यान, उज्जैन येथील संघाचे सहप्रचारप्रमुख कुंदन चंद्रावत यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयाचा पुरस्कार देण्यासंबंधीची घोषणा केल्याबद्दल विचारले असता संघाचा हिंसेवर विश्वास नसल्याचे सांगितले. हिंसेमुळे नव्हे तर स्वयंसेवकांच्या कर्तृत्वावर संघाचा प्रसार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)