धन गुरू नानक सारा जग तारिया

By Admin | Updated: November 27, 2015 03:20 IST2015-11-27T03:20:25+5:302015-11-27T03:20:25+5:30

कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली.

Money Guru Nanak Sara Jag Stariya | धन गुरू नानक सारा जग तारिया

धन गुरू नानक सारा जग तारिया

गगनभेदी जयघोषांनी निघाली शोभायात्रा : गुरू नानकदेव यांची ५४६ वी जयंती
नागपूर : कलियुगाचे अवतार गुरू नानकदेव यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त धार्मिक गुरुबाणी प्रचार-प्रसार संस्था आणि कलगीधर सत्संग मंडळाद्वारा आयोजित भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली. शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू सहभागी झाले होते. याप्रसंगी गुरू नानकदेवांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.
दुपारी १ वाजता अतिथी व श्रद्धाळूंच्या उपस्थितीत पूजाअर्चना करण्यात आली. यानंतर शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेत गुरू ग्रंथ साहेबांचा मनमोहक रथ होता. बँडपथक, आतषबाजीच्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविक शोभायात्रेत सहभागी झाले होते. भाविकांतर्फे मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुष्पहार आणि प्रसाद समर्पित करण्यात येत होता. मनमोहक रथासमोर युवक नृत्याचा फेर धरून आनंद व्यक्त करीत होते. यावेळी गुरू अंगददेव, गुरू अमरदास, गुरू रामदास, गुरू अरजनदेव, गुरू हरगोविंद, गुरू हरिराय साहेब, गुरू हरिकिशनदेव, गुरू तेगबहादूर, गुरू गोविंदसिंग, मां भगवती आदींच्या विहंगम दृष्यांचे रथ होते. परिश्रमाने मिळवलेले धनच खरे धन आहे, असा संदेश देणारा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. अकराही गुरूंच्या संदेशाचे चित्ररथ शोभायात्रेत असल्याने भाविक श्रद्धेत चिंब झाले. शोभायात्रेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माधवदास ममतानी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शोभायात्रेला महापौर प्रवीण दटके, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, आ. मिलिंद माने, आ. अनिल सोले, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, नगरसेवक सुरेश जग्यासी, प्रकाश तोतवानी, गिरीश व्यास, प्रतिभाताई मेंढरे, जयप्रकाश गुप्ता, वीरेंद्र कुकरेजा, अतुल कोटेचा, पीआय संजय सांगोडे, रमेश वानखेडे आदींनी भेट देऊन पूजन केले.(प्रतिनिधी)

Web Title: Money Guru Nanak Sara Jag Stariya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.